ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मुश्रीफ हे भाजपला पुरून उरतील; आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे’ : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थन करण्यासाठी मंगळवारी गृह राज्य, पालकमंत्री सतेज पाटील मैदानात उतरले. तर दरम्यान कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हा कार्यालयात झाली. त्यामध्ये सोमय्या यांचा निषेध व्यक्त करुन त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.असं ते म्हणले,हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याचा इन्कार करीत मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान मुश्रीफ यांना आज कोल्हापुरातून काँग्रेस व राष्ट्रवादीतून समर्थन देण्यात आले.
जनमनात स्थान असलेल्या मुश्रीफ सारख्या नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे., मुश्रीफ हे भाजपला पुरून उरतील असा आरोप करून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, आजवर अनेक संकटे दूर पळवून लावणारे मुश्रीफ याही संकटावर ताकतीने मात करतील. निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप होत राहतील. परंतु त्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधींच्या व्यक्तिगत मागे लागणे हे महाराष्ट्रसाठी अशोभनीय आहे. मुश्रीफ यांची यापूर्वीही चौकशी झाली असताना पुन्हा त्यांना बदनाम करणे चुकीचे आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला कोल्हापुरी पायतानाने मार दिला. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणच्या वतीने निषेध सभा व जोडे मारो आंदोलन मार्केट यार्डातील पक्षाच्या कार्यालयसमोर आंदोलन झाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks