ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी जनतेची ससेहोलपट करू नका : आमदार हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना ; गडहिंग्लज शहर व कडगाव -गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या “शासन आपल्या दारी” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

अनेक सरकारी योजनांचे लाभ अधिकाऱ्यांनी जनतेला गावातल्या -गावातच देण्यासारखे आहेत. त्यांच्या अडवणुकीने आकडा फुगवून वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी जनतेची ससेहोलपट करू नका, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जोपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचून यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

गडहिंग्लजमध्ये गडहिंग्लज शहर व कडगाव -गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आयोजित “शासन आपल्या दारी” या अभियानात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या उपक्रमाला पाच हजाराहून अधिक ग्रामस्थांनी उपस्थिती लावली व विविध योजनांसाठी कागदपत्रे सादर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने आयोजन केले होते.

आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना बी- बियाणे वाटप, रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग पाच टक्के अनुदान, गरोदर माता पोषण आहार, तलाठी फेरफार डायऱ्या, पी. एम. किसान इ -केवायसी, एमएसईबीकडून घरगुती, कृषी व औद्योगिक वीज कनेक्शन, विद्युत मीटर दुरुस्ती अशा कितीतरी योजनांचे लाभ गावातल्या -गावातच देण्यासारखे आहेत. लाभार्थ्यांच्या आकड्याचा फुगवटा करण्यासाठी जनतेला ताटकळत ठेवून त्यांनी शासन आपल्या दारी उपक्रमातच येऊन लाभ घ्यावा हा अट्टाहास धरू नका, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहरासाठी १०० कोटी निधी आणून शहर सर्वांगसुंदर केले. तसेच; शहरातील झोपडपट्ट्यांमधील झोपड्या नियमानुकूल करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचे १५० लाभार्थी, नवीन ७५ रेशन कार्डे यासह आयुष्यमान भारत योजनेच्या नोंदविलेल्या आठ हजार कार्डधारकांपैकी २५ जणांना प्रातिनिधीक स्वरूपात कार्डवाटप झाले.

३००० घरकुले बांधणार……

श्री. मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराचा सुधारित विकास आराखडा तयार आहे, त्याची सुनावणीही सुरू आहे. या आराखड्याला अंतिम स्वरूप आल्यानंतर खाजगी जमीन धारकांकडून आपण स्वतः, फाउंडेशनच्या माध्यमातून व सीएसआर फंडाच्या माध्यमातून जागा विकत घेऊ. त्यावर घरे नसलेल्या नागरिकांसाठी तीन हजार घरकुले उभारू.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी जनतेच्या कल्याणाच्या सर्व योजना गावागावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर घरोघरी पोहोचविल्या आहेत. माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम म्हणाले, हसनसाहेब मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या योजना काय असतात हे आमदार, राज्यमंत्री आणि मंत्री झाल्यावर दाखवून दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते रमजान अत्तार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निव्वळ राजकीय पक्ष नसून सातत्याने सामाजिक काम करणारा तो सामाजिक पक्षही आहे. नगरसेवक सौ. रेशमा कांबळे म्हणाल्या, आमदार हसन साहेब मुश्रीफ यांच्या पावलावर पाऊल टाकीत आम्ही सर्वच कार्यकर्ते जनतेच्या घरोघरी जाऊन कामे करीत आहोत.

माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, माजी जि.प सदस्य सतीश पाटील, उदयराव जोशी, वसंतराव यमगेकर, शहर अध्यक्ष सिध्दार्थ बन्ने, संचालक बाळासाहेब देसाई- मिणचेकर, अशोकराव मेंडूले, सरपंच सचिन देसाई, बंटी पाटील, माजी नगरसेवक हारुण सय्यद, रमजान आत्तार, दिपक कुराडे, अशोक खोत, पृथ्वीराज पाटील, राजू जमादार, रमेश पाटील, आदित्य पाटील, महेश सलवादे, गुंडू पाटील, अमर मांगले, उदय परीट, प्रशात शिंदे, शहर अध्यक्ष सौ. शर्मिली पोतदार, माजी नगरसेविका सौ. रेश्मा कांबळे, सौ. रुपाली परीट, सौ. अरुणा कोलते, सौ. गिता पाटील, सौ. उर्मिला जोशी, श्रीमती शारदा आजरी, सौ. उषा मांगले, माधवी जाधव, विकी मल्होत्रा, सुरेश म्हेत्री, इकबाल सनदी, टी. एस. देसाई, राहूल शिरकोळे, अवधुत रोटे, संजय बाडकर, डाॕ. पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks