ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूडच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक संकुलची कुस्तीगीर नेहा चौगलेची टी.सी. म्हणून निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नेहा किरण चौगले हिची रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून निवड झाली. खेळाडूंसाठी राखीव असलेल्या रेल्वेमधील सीसीटीसी या पदाच्या भरतीसाठी जानेवारी महिन्यात मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धा भरल्या.
या स्पर्धेतील विजयातून कायमची नोकरी मिळणार असल्यामुळे या स्पर्धेत नेहमीप्रमाणे ती ईर्षेने उतरली. मात्र पहिली लढत होती मध्य प्रदेशातील ५० किलो गटात पराभूत केलेल्या प्रियांशी बरोबर पण तरीही ६२ गुण फरकाने तिला पराभूत करून नेहाने आगेकूच केली. तर मध्य प्रदेशच्याच माधुरी पटेललाही ६- ३ ने हरवत आपल्या निवडीवर शिक्कामोर्तब केला. राजस्थानमधील उदयपूर येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष सेवेस हजर राहणार आहे.