महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे : सतिश वसगावकर

कौलव प्रतिनिधी :
शिरगाव येथे बचतगटातील महीलांना व्यवसाय प्रशिक्षण महिलांनी घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आवाहन चैतन्य संस्थेचे प्रशिक्षणार्थी श्री सतीश वसगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविक शितल कुसाळे यांनी केले असून अध्यक्षांनी मीना माने होत्या.
महिलांनी लघुउद्योग, स्वतः व्यवसाय करुन कुठूंबाच्या आर्थिक परिस्थितीत बदल होण्यासाठी चैतन्य संस्था राजगुरुनगर आणि महिंन्द्रा आणि महिंन्द्रा यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या शिरगाव ता राधानगरी येथील बचत गटातील महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण तीन दिवसासाठी घेण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतिश वसगावकर बोलत होते.
हे प्रशिक्षण तीन दिवस चालणार आहे. प्रशिक्षणाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनाने झाली स्वागत आणि प्रास्ताविक संघाच्या कार्यकर्त्यां शितल कुसाळे यांनी केले. .आज शिरगाव येथे सुरु झालेल्या प्रशिक्षणात ४०प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला आहे.यावेळी संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते बोलताना म्हणाल्या कुठूंबाच्या आर्थिक विकासासाठी कुठूंबातील प्रमुख महिलेने छोटे – मोठे व्यवसाय सुरु करुन आर्थिक बचत केली पाहिजे यासाठी छोटे -मोठे व्यवसाय करणेकरिता प्रोत्साहन ,मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य आमच्या संघाच्या वतीने करणेत येईल.हे प्रशिक्षण संघाच्या १५गावातील ५००महिलांना देणार आहे. यावेळी गावातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या .आभार उषाताई पोवार यांनी मानले.