लाडक्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत नांदणी मध्ये आणण्यासाठी मुरगुडकरांचा पुढाकार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
नांदणी येथील जिनसेन मठामध्ये असणारी लाडकी माधुरी हत्तीण वनतारा मध्ये नेण्यात आली आहे . गेली 35 वर्ष कोल्हापूरच्या लोकांसोबत तिचा जिव्हाळा जोडला गेला आहे त्या बाबतीत लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत तिला तिच्या घरापासून दूर लोटने हे अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळे समस्त मुरगुडवासी यांच्यातर्फे कोल्हापूरचे सुजित क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी यांच्यावतीने कोल्हापूरचे डी वाय एस पी यांना लोकांच्या जनभावना समजून सांगण्यात आल्या तसेच बेंगलोर केरळ तसेच अनेक ठिकाणी एलिफंट रेस्क्यू सेंटर आणि उपचार केंद्र असताना देखील खाजगी वनतारा मध्ये नेण्यात आल्याबद्दल नाराजी वक्त करण्यात आली.
यावेळी शिवभक्त समाजसेवक सर्जेराव भाट, ओंकार पोतदार , संकेत शहा, तानाजी भराडे, जगदीश गुरव, अमित मिठारी सिद्धेश पोतदार,श्रेणिक भैरशेट संजय उपादे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.