मुरगुड : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मध्ये महिला सन्मान सोहळा संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे युवती विकास मंच, अंतर्गत तक्रार निवारण समिती व राष्ट्रीय सेवा योजना मार्फत दिनांक 8 मार्च ते 11 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 8 मार्च रोजी मा प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने या समारोहाचे उदघाटन करण्यात आले यानंतर रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा, केशरचना स्पर्धा व साडी पेहराव स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रा डॉ एस एम होडगे प्रा डॉ के एस पवार प्रा मांगले प्रा सुशांत पाटील,प्रा हो दिपाली फराकटे, प्रा राणी शिंदे ,राजू व्हनबट्टे, श्री मुसळे यांनी परीक्षण केले.
समारोहाची सांगता दिनांक 11 मार्च रोजी ” यशस्वी व कर्तुत्ववान महिलांच्या” सन्मान सोहळ्याने झाली. सदर कार्यक्रमांमध्ये सौ रुपाली माळी, संचालिका अग्रो प्रॉडक्टस, सांगाव, श्रीमती विमलताई सुतार, संचालिका वृद्ध महिला आश्रम, वंदूर व सौ सूनिता गुजर प्रोप्रा एस मॉल, मुरगुड यांचा मा प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये भारत सरकार तर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये मुरगूड नगरपरिषदेला सलग तीन वर्षे अव्वल नंबर मिळवून दिल्याबद्दल महिला सफाई कामगारांना सन्मानचिन्ह व साडी देऊन गौरवित करण्यात आले. सदर स्पर्धेचे संयोजन महाविद्यालयातील युवती विकास मंच व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्रा डॉ सौ माणिक पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा डॉ सौ माणिक पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा कु दिपाली भोळे व कु राधिका देसाई केले सदर सन्मान सोहळ्यामध्ये उपप्राचार्य डॉ टि. एम पाटील, कार्यालय अधीक्षक श्री दिलीप कांबळे, महिला प्राध्यापक स्टाफ, प्रवीण सूर्यवंशी, मुरगूड नगरपरिषदेच्या नगरसेविका, शिंदेवाडी गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ महिला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेते पुढील प्रमाणे:
केशरचना स्पर्धा
०९/०३/२०२२
प्रथम क्रमांक
अश्विनी आनंदा जाधव
बी.कॉम.I
द्वितीय क्रमांक
कुमुधेनू काकासो गोते
बी.एस.सी. I
तृतीय क्रमांक
वैष्णवी सुनील लोहार
बी.एस.सी. Iभिंतीपत्रिका स्पर्धा/ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा
०९/०३/२०२२
प्रथम क्रमांक
आरती महादेव मोरबाळे
बी.कॉम. III
द्वितीय क्रमांक
अश्विनी चंद्रकांत माने
बी.एस.सी. I
तृतीय क्रमांक
राधिका रणजीत देसाई
बी.ए. III
रांगोळी स्पर्धा
०८/०३/२०२२
प्रथम क्रमांक
वैष्णवी सुनिल लोहार
अमृता बाबासो लोंढे
बी.एस.सी.I
द्वितीय क्रमांक
स्नेहा शहाजी फराक्टे
माधवी दत्तात्रय पाटील
ज्योती ज्ञानदेव खुटाळे
बी.सी.ए. III
तृतीय क्रमांक
गीता तानाजी पटाडे
प्रणिता विठ्ठल म्हातुगडे
बी.एस.सी. III
साडी पेहराव स्पर्धा
दिनांक 11/०३/२०२२
प्रथम क्रमांक
कुमारी वेदिका मगदूम बी कॉम 3
द्वितीय
कुमारी ऋतुजा मगदूम बी कॉम 3
तृतीय
कु. दर्शना घुंगरे पाटील बि. ए. 3