मुरगुड : पाऊले चालती पंढरीची वाट. वारकरी पंथाची फुलु दे पहाट.

मुरगुड प्रतिनिधी :
आषाढी एकादशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचा वर्षातला सर्वात मोठा उत्सव .
या उत्सवाला जे अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे ते त्यातील भक्तीभावामुळे .वारकरी पंथाची शिकवण माऊली भावाने होते .
‘माऊली ‘त भक्ती,श्रद्धा ,जिव्हाळा ,माणुसकी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वधर्मसमभाव सामावला आहे
वारकरी पंथाच्या या गुण वैशीष्ट्यांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या करिता आषाढी एकादशीचे निमित्त साधून न्यूइंग्लिश मिडीयम स्कूल ने वारकरी फेरीचा कार्यक्रम आयोजित केला होता .
उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा ब भार ज्यांचेवर आहे त्या पोलिसांना प्रथम अभिवादन करून या छोट्या वारकऱ्यांनी गणेश मंदिरात पारंपरिक फुगड्या ,भजने ,व विठ्ठलनामाचा गजर केला .
त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हाही उद्देश होता .त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह यातून कार्यक्रमाची उंची वाढली .
शाळेचा सर्व शिक्षकवृंद देखील यात समाविष्ट झाला होता .पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल भगिनींनी फेरीचे स्वागत केले .गणेश मंदिर व परिसरात आषाढी वारीला पंढरीला निघालेल्या कांही वारकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवत माऊली धर्माचे पालन केले.
रविवार सुट्टी चा दिवस असल्याने आदल्या दिवशी शनिवरीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
प्राचार्या जसमीन जमादार यांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले ,संगीत शिक्षक सुतार यांनी भजन गायनाची साथ दिली .