सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय येथे शिक्षक पालक संघाच्या वतीने पालक मेळावा बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पाडला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रशिक्षण कार्यवाह श्रीमती स्मिता सुधीर होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे सर होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य प्रा.डॉ.शिवाजी पोवार , पालक शिक्षक संघाचे समन्वयक प्रा.डॉ. पी.आर.फराकटे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ.ए.डी.जोशी,नॅक समन्वयक प्रा. डॉ. एम.एस. पाटील , एन.सी.सी. प्रमुख आणि वाणिज्य विभागप्रमुख ले. प्रा. व्ही.ए. प्रधान उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि स्व. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
स्वागत व प्रास्ताविक शिक्षक-पालक संघाचे प्रमुख प्रा.डॉ. पी.आर.फराकटे यांनी केले.त्यांनी ” एकमेका सहाय्य करु, अवधे धरू सुपंथ” या उक्तीनुसार पालक व शिक्षकांनी एकत्र आल्यास महाविद्यालय नक्कीच यशाच्या शिखरावर पाहोचेल असे सांगितले. यानंतर सर्व प्राध्यापकांनी आपली ओळख पालक व विद्याथ्यांसमोर करून दिली. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे सर यांनी महाविद्यालय परिसर,विविध विभाग,विविध विद्यार्थी सहाय्यता योजना इ. ची माहिती दिली.त्याच बरोबर स्थापनेपासून आजपर्यंतचा कॉलेजचा प्रवास स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध आहे,अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले,त्यामध्ये हिंदुराव गोधडे,समीर हळदकर,अनुराधा अनिल राऊत, परशराम गिरिबुवा,राजश्री गिरीबुवा, राजू मंडलिक इ.यांचा समावेश होता.या कार्यक्रमामध्ये पालक-विद्यार्थी यांच्या सूचना,तक्रारी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन ज्येष्ठ प्राध्यापकांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा .स्नेहा हवालदार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रा.सामंत सर, प्रा.गोरुले सर, प्रा. खतकर सर, प्रा. निलेश रायकर, प्रा. गुजर मॅडम,प्रा. कुदळे मॅडम, प्रा.पाटील , प्रा. मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.