ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड : भारतीय सेनेतील जवानांना न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांकडून राख्या 

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

देशाच्या व पर्यायाने आमच्याही रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सेनेतील जवानांना आम्हीं राख्या पाठवल्या आहेत .त्या त्यांनी आपल्या मनगटावर बांधून त्याचे फोटोही आम्हांला पाठवले आहेत असे मुरगुडच्या न्यू इंग्लिश स्कूल च्या मुलामुलींनी सांगितले .

     रक्षाबंधना दिवशीच लेह व लडाख सीमेवरून आलेले राखी बांधलेल्या जवानांचे फोटो त्यांना प्राप्त झाल्याचा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वहात होता .

     अमृतमहोत्सवी  स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण देखील भारतीय जवानांच्या हस्तेच करावयाचे शाळा प्रशासनाने ठरवले आहे .

     सद्या रजेवर असलेल्या सीमेवरील जवानांच्या त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे .त्या दिवशीही विद्यार्थी जवानांना राख्या बांधतील .

   लेह लडाख च्या जवानांना जुलै मध्ये पोस्टाने राख्या पाठवल्या होत्या .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks