मुरगूड नगरपालिकेवर जनतेच्याच विचाराचा नगराध्यक्ष असणार : प्रविणसिंह पाटील

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूडच्या नगराध्यक्षपदी जनतेच्याच विचाराचा नगराध्यक्ष असणार आहे.असे उदगार माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी येथे काढले.मुरगूड येथील सावर्डेकर कॉलनी मधील नवीन काँक्रिट गटार बांधकामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या कामात आपण नेहमीच अग्रेसर राहू. गेल्या ९ वर्षात अनेक राजकीय घडामोडी झाल्या.सत्ता ही येते जाते म्हणून आपण कधीही सत्ता डोक्यात घुसू दिली नाही. सत्ता असो वा नसो लोकांसाठी काम करत राहणे एवढाच विचार केला.या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी जनसंवाद साधून लोकांच्या समस्या समजावून घेतल्या व नागरी सुविधांसाठी आपण प्रयत्नशील राहू असा शब्दही दिला.
मुरगूड येथील भारमल नगर,सावर्डेकर कॉलनी ,ज्ञानेश्वर कॉलनी, भोसले कॉलनी, जांभूळ खोरा, माधवनगर, प्रगती कॉलनी,महाजन कॉलनी या काॅलनीतील रहिवाशांना शेतसारा व नगरपालिकेचा घरफाळा भरावा लागत आहे.त्यांच्यासाठी दहा दिवसापुर्वी जिल्हाधिकारी व नामदार हसनसौ मुश्रीफ यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे त्याबाबतची कारवाई निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी सावर्डेकर कॉलनीतील महीलांनी प्रविणसिंह पाटील यांचे औक्षण करुन स्वागत केले.
यावेळी समाधान हावळ, दत्तात्रय शिरसेकर,मधुकर मसवेकर,पांडुरंग राजपुत, दस्तगिर जमादार,आविनाश बाबर,प्रविण लोहार, राजू जमादार यांचेसह नागरिक उपस्थित होते.