मुरगूड पालिकेचा होणार राष्ट्रपतींकडून सन्मान : देशात उत्कृष्ट कामगिरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात सफाई मित्र सुरक्षा स्पर्धेत देशात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव आहे.२० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे एका शानदार कार्यक्रमात हा सन्मान होईल.मुरगूडच्या इतिहासात प्रथमच पालिकेला राष्ट्रपतीच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याने हा मुरगूडकरांचाही सन्मान होत आहे. राष्ट्रपती भवनातून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तशा आशयाचे पत्र पालिकेला मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन २०१८-१९ स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मुरगूड शहराचा देशात १६ वा तर राज्यात सहावा क्रंमाक आला होता. तसेच २५ हजार लोकवस्तीच्या नागरी क्षेत्राअंतर्गत देशपातळीवरील पश्चिम विभागातून मुरगूड शहराचा नववा क्रंमाक आला होता. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रंमाक आला होता. गतवर्षी यामध्ये सुधारणा होऊन देशात आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर शहराला मानांकन मिळाले होते. सलग तीन वर्ष चांगली कामगिरी केल्या बद्दल दोन वेळा दहा कोटीचे बक्षिसही मिळाले आहे. चालू वर्षीही या पालिकेला पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. मुरगूडच्या इतिहासात प्रथम पालिकेचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान मिळत आहे.
पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्व नागरिक, नगरसेवक, पालिका सफाई कामगार व इतर घटक यांनी अनमोल सहकार्य केल्यानेच हे यश मिळाल्याचे नगराध्यक्ष जमादार यांनी सांगितले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांना मुरगूडचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे शहर व्हावे अशी अपेक्षा होती. खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने हे चांगले काम केले. स्वच्छ भारतचे ब्रॅन्ड अम्बॅसिडर अॅड.विरेंद्र मंडलिक व तत्कालीन मुख्याधिकारी संजय गायकवाड, मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यामुळे स्वच्छता अभियान यशस्वी झाल्याचेही नगराध्यक्ष जमादार यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस स्वच्छता ब्रॅन्ड अम्बॅसिडर अॅड. विरेंद्र मंडलिक,उपनगराध्यक्षा सौ . रंजना मंडलिक,पक्ष प्रतोद संदीप कलकुटकी,नगरसेवक नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले,धनाजी गोधडे, विशाल सूर्यवंशी, राहुल वंडकर,रविराज परीट, मारूती कांबळे,सुहास खराडे, बाजीराव गोधडे , प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, अनुराधा राऊत, हेमलता लोकरे, रूपाली सणगर, वर्षाराणी मेंडके, रेखाताई मांगले, संगीता चौगले,दत्तात्रय मंडलिक, सचिन मेंडके, भगवान लोकरे, आनंदा मांगले,राजेंद्र भाट, अनिल राऊत, अक्षय शिंदे,अमर सणगर, प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते .