ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाचा सत्कार ; माजी उपनगराध्यक्ष संतोष वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

मुरगूड नगरपालिकेचा स्वच्छ सुंदर शहर अभियाना अंतर्गत केंद्रात 26 वा व राज्यात 4 था क्रमांक आल्याबद्दल नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांचा भेटवस्तू देऊन नागरी सत्कार करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांच्या वाढदिवसानिमित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे मुरगूड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अतिश वाळूंज म्हणाले,तुम्ही केलेला सत्कार म्हणजे आम्हाला मिळालेले प्रोत्साहन आहे. सत्कारामुळे आमचे कर्मचारी व आम्ही आज राज्यात 4 क्रमांक आला असला तरी तुमच्या या सत्काराच्या जोरावर व पाठबळामुळे पहिला क्रमांक मिळवण्यासाठी अग्रेसर राहू असे ते बोलताना म्हणाले.

यावेळी वाढदिवसाचे निमित्त साधून संतोष वंडकर यांचा सत्कार मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले व डॉ. अशोक खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी दगडू शेणवी,बबन बारदेस्कर, संतोष वंडकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे राजू आमते दत्तात्रय जाधव, मोहन कांबळे, बाजीराव चांदेकर अमर देवळे अनिल बोटे,शंकर इंगवले,मेंडके आदी उपस्थित होते.

स्वागत राजू चव्हाण प्रास्ताविक प्रा.पृथ्वीराज कदम यांनी केले.सूत्रसंचालन अमोल एकल यांनी तर
आभार बाळासाहेब मंडलिक यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks