ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड – दुर्गमानवाड एसटी पुन्हा सुरु ; तनिष्का च्या पाठपुराव्याला यश

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोरोना कालावधी दरम्यान बंद असलेली दुर्गमानवाड – मुरगूड ही एसटी बस राधानगरी आगाराने पुन्हा सुरू केली असून तनिष्का व्यासपीठाने केलेल्या मागणीस व पाठपुराव्यास अनुसरून ही बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने अनेक, विद्यार्थी,भावीक भक्त व प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

दुर्गमानवाड व आदमापूर ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख महत्त्वाची देवस्थाने असून भाविक भक्तांना देवी श्री विठ्ठलाई व संत बाळूमामा यांच्या दर्शनास येण्या- जाण्यासाठी ही बस सेवा उपयुक्त ठरली आहे. शिवाय दुर्गमनवाड , कसबा तारळे , गुडाळवाडी , गुडाळ, खिंडी व्हरवडे, आकनूर, मांगेवाडी, सरवडे , मुधाळतिठ्ठा, आदमापूर, निढोरी व मुरगुड या मार्गावरील व शेजारच्या गावांतील अनेक भाविक भक्त तसेच नोकरदार व्यावसायिक आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाला या बस वाहतुकीचा मोठा उपयोग होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks