ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड : फसवणूक प्रकरणी इचलकरंजीच्या महिलेसह तिघांवर गुन्हा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

पंधरा दिवसात गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट करून देतो असे सांगून गंडा घालणाऱ्या इचलकरंजी येथील महिलेसह तिचा साधीदार यांच्यावर मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जॉन्सन फर्नांडिस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत रेश्मा नदाफ (रा. इचलकरंजी), विजय येटाळे (रा. सरवडे ता. राधानगरी), योगेश बाळासो राणे (शाहूपुरी ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले आहे.

फ्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे फर्नांडिस यांनी त्यांच्या मित्राच्या ओळखीतून विजय येटाळे याच्याकडे गेले. येटाळे याने दिल्ली येथील एका कंपनीच्या डायरेक्टर रेश्मा नदाफ यांच्याकडे पैसे जमा केले, तर त्या १५ दिवसात दुप्पट करून देतात, असे सांगितले. त्यानुसार १० फेब्रुवारी २०२२ रोजी फर्नाडिस यांनी येटाळेला १५ लाख रुपये दिले. मात्र दोन महिने झाले तर मुळ रक्कम अथवा दुप्पट झालेले रक्कम परत मिळाली नाही.

फसवणूक प्रकरणी इचलकरंजीच्या महिलेसह तिघांवर गुन्हा याबाबत रेश्मा यांना फोन करून विचारणा केल्यानंतर त्यांनी वारंवार टोलवा टोलवी केली. दरम्यान, येटाळेने सात लाख रुपये परत केले. तर आठ लाख रुपये देण्यास टाळले. २७ एप्रिल, २०२२ रोजी योगेश राणे याने फर्नाडिस यांना फोन करून धमकी दिली, असे तक्रारीत नमूद केले आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील गुंतवणूकदारांनी संघटन करून पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसे निवेदनही निलेश शिंदे, सागर पाटील, सचिन माळी, सुरेश रेपे, गुरुराज कुलकर्णी, अनिकेत रामाने, दीपक देसाई, जया देसाई, प्रविण जाधव, जॉन्सन फर्नांडिस यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks