ताज्या बातम्या
मुरगूड विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

मुरगुड प्रतिनिधी :विजय मोरबाळे
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालयाच्या २००२-०३ सालच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १५ मे रोजी उत्सहात पार पडला.
२००२-०३ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी बॅचला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या मेळाव्याचे आयोजन मुरगूड विद्यालयामध्ये केले होते. या मेळाव्यास २००२-०३ सालच्या मुरगूड विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूड विद्यालय (ज्युनि. कॉलेज) चे प्राचार्य श्री एस. आर. पाटील सर होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री आर. एन. संकपाळ सर व श्री पी. डी. पाटील सर
उपस्थित होते.