मुकेश सारवान सेनेच्या सरसेनापती सुरेश तामोत यांनी लढवली प्रशासकीय खिंड… वर्षभर रखडलेल्या वारसा हक्क नियुक्तींची फोडली कोंडी… कोल्हापूर महानगरपालिका

प्रतिनिधी:
नियमित वारसा हक्क नियुक्तीसह एक वर्ष मुदतीत अर्ज न केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांनाही मिळणार नोकरी…
सफाई कामगारांच्या न्याय हक्क मागण्यांवर वादळी चर्चा…
सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देताना महानगरपालिकेला नवीन रेडिरेक्टनर दराप्रमाणे जादा रक्कम भरण्यास संघटनेचा विरोध…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेच्या १००% शासकीय अनुदानातून सफाई कामगारांना मोफत घरे बांधून द्यावीत…
कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न व मागण्यां संदर्भात शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने मा.शिल्पा दरेकर मॅडम यांचे दालनात आढावा बैठक घेण्यात आली.
आजच्या बैठकीत सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेची अंमलबजावणी करणे, लाड पागे समिती शिफारसनुसार पात्र प्रलंबित वारसा हक्काने नियुक्ती प्रकरणे निकाली काढणे, एक वर्ष मुदतीत अर्ज न केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने नियुक्ती देणे, भरपगारी जाहीर सुट्ट्यांचा लाभ देणे,
थकीत कोव्हिड प्रोत्साहन भत्ता आदा करणे या शासन निर्णय व आदेशांची कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने वर्षानुवर्षे कोणतीही अंमलबजावणी केली नाही याबाबत राज्य मुख्य सचिव सुरेश तामोत यांनी प्रशासनास जाब विचारला तसेच तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी चर्चेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल लाड, उपाध्यक्ष प्रभाकर लाड, मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र विभाग) जिल्हा समन्वयक श्रीधर लाड, जिल्हा अध्यक्ष सचिन पंडत,शहर अध्यक्ष नितीन कचोटे, विनायक पंडत यांनी सहभाग घेतला.
यावेळी शासन निर्णय, परिपत्रक यांना अनुसरून पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल असे मा.शिल्पा दरेकर मॅडम यांनी आश्वासित केले.
याप्रसंगी विषयांशी संबंधित प्रशासनातील सर्व अधिकारी, दिपक कागलकर, शेखर पंडत,आदित्य पंडत, विशाल पंडत,नरेश पंडत, अनिकेत पंडत,रंजीत लाड, नितीन लाड यांच्यासह कामगार बंधू – भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.