मुदाळच्या प.बा. पाटील संकुलाचा एन.एम.एम.एस.परीक्षेत देशात नवा विक्रम एकाच वेळी १५५ विद्यार्थी ठरले गुणवत्ता व शिष्यवृत्ती धारक. रणजितसिंह पाटील यांची माहीती.

भुदरगड प्रतिनिधी : प्रकाश पाटील
शै.वर्ष २०२०-२१ मध्ये शासनाच्या राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्टया मागास वर्गीय शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत एकाच वेळी एकाच शाळेतून सुमारे १५५ विद्यार्थी गुणवत्ता व शिष्यवृत्तीधारक ठरले असून हा देशात विक्रम असल्याची माहिती संस्था खजानीस,गोकूळ व केडीसीसी बॅंक संचालक रणाजितसिंह पाटील यांनी निकाल न्युज शी बोलताना दिली.
मुदाळचा शिक्षण पॅटर्न राज्यभर चर्चेत राहीला असून आजपर्यत या एन.एम.एम.एस परीक्षेत ७५५ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून रु.४ कोटी इतकी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. इ.८वी साठीच्या या राष्ट्रीय व राज्य दर्जाच्या स्पर्धा परीक्षेत
उल्लेखनिय यश संपादन करत गुणवत्ता हा फॉर्म्यूला गेली २५ वर्ष संभाळत आली आहे मुदाळच्या प.बा. संकुलाच्या गुणवत्तेची खरी केमिस्ट्री काय ?या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने या संकुलाला भेट देवून पॅटर्न आजमावला पण गुणवत्तेतल्या सातत्याचा शोध मात्र लावता आलेला नाही.इथला गुरुवर्य या विद्यार्थीसाठी सकाळी ७ ते संध्या. ७ पर्यत अहोरात्र गुणवत्तेशी सामना करताना झगडतोय. हेच या यशाचे खरे रहस्य असल्याचे त्यांनी नमुद केले.इ.५वी,व इ. ८वी ,शिष्यवृत्ती परीक्षा, इ.१० वी. एन.टी.एस. परीक्षा, गणित,विज्ञान,प्रज्ञा शोध परीक्षा अशा सर्वच स्पर्धा परीक्षेत संकूलाचे यश अलौकीक आहे.म्हणून तर हा पॅटर्न आज राज्यभर चर्चेत आहे.५ वी इ ८वी ऑलीम्पीयाड ,सीबीएसई धर्तीचा पॅटर्न संकूलात सुरु ठेवला आहे. ११ वी,१२ वी विज्ञान शाखेंसाठी जीईई,नीट,एमएचसीईटी,अँडव्हान्स अशा परीक्षाच्या तयारीसाठी विज्ञान अँकेडमी सुरु करुन या परीक्षेतील यशाचा आलेख चढ़ता ठेवला आहे.संकुलात आज या परीसरातील सुमारे १४० ग्रामीण लोकवस्ती खेड्यातील १८०० हुन आधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकला पाहीजे हाच हेतू ठेवून आम्ही गुणवत्तेचा फॉर्म्यूला आखला आहे. यात सातत्य कायम ठेवण्यावर उपाय योजना केली असून स्कूल टाईम टेबलच्या पलिकडे जावून गुणवत्तेचे मास्टर टाईम टेबल सक्सेस रेट मध्ये प्रभावी ठरले असून नजीकच्या काळात हे संकूल प्रति सिम्बॉइसिस तर ठरेलच उद्याच्या काळात . शिक्षण गुणवत्ता ,सजगता, याच उत्तर राज्याच्या शिक्षण विभागाला मुदाळच्या प.बा.संकूलाच्या गुणवत्तेने मिळून जाईल अशी खात्रीही शेवटी रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.