खासदार संजय राऊत यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर.

NIKAL WEB TEAM :
ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संजय राऊतांना अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी पीएमएलए न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात आला. मात्र, राऊत हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता राऊतांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ईडीकडून केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.