मनसेतर्फे पत्रकारांसाठी १ लाखांचा अपघाती विमा देणार : युवराज येडूरे

गारगोटी प्रतिनिधी :
वर्षाचे बाराही महिने ऊन, वारा, थंडी, पाऊस-वादळ, नैसर्गिक आपत्ती यांची पर्वा न करता पत्रकारितेचा वसा जोपासणाऱ्या पत्रकार बांधवांना पत्रकारदिनाच्या शुभमुहूर्तावर मनसे नेते युवराज येडूरे यांनी एक लाखाचा अपघाती विमा देणार असल्याचे जाहीर केले.
सामाजिक बांधिलकी या नात्याने मनसेतर्फे पत्रकार बांधवांना मोफत अपघाती विमा संरक्षण दिले जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अपघाती विमा संरक्षण नोंदणीसाठी पत्रकार मित्रांनी खालीलप्रमाणे कागदपत्रांसह संपर्क साधावा असे आवाहन युवराज येडूरे यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
१) आधारकार्ड झेरॉक्स
२) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
३) पॅनकार्ड झेरॉक्स
४) ड्रायव्हिंग लायसन झेरॉक्स
५) वृत्तपत्र, वृत्तवाहिनीच्या ओळखपत्राची झेरॉक्स
६) कायम स्वरुपी संपर्क क्रमांक
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/message/ANLCDNHWZTFPL1
☎️9284286830