ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मेघोली प्रकल्प उभारणीस त्वरीत मंजूरी देऊन आर्थिक निधीची तरतूद करावी : आबिटकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई प्रतिनिधी : 
काल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची राधानगरी-भुदरगड-आजरा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी  ‘वर्षा निवासस्थानी’ भेट घेत मेघोली धरणफुटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करून प्रकल्प उभारणीस त्वरीत मंजूरी देऊन आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी केली.
या मागणीस अनुसरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सदर प्रकल्प फुटल्याने झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून व धरणाचे बांधकाम करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांना दिले.
भुदरगड तालुक्यातील मेघोली ल.पा.तलाव फुटल्यामुळे 400 हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले असून यामध्ये जिवीतहानी व पशुधनाची देखील हानी झाली आहे. याबाबत पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व जिल्ह्याचे खासदार संजयदादा मंडलिक यांचे समवेत प्रकल्प फुटीची पाहणी केली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्प उभारणीस निधीची मागणी व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी असे शेतकऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेवेळी ठरले होते.
त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वर्षा निवासस्थानी भेट घेऊन प्रकल्पामुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती सांगितली असल्याचे आबिटकर म्हणाले. 
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून प्रकल्प उभारणीस विनंती केली होती. त्यानुसान त्यांनी राज्यशासन म्हणून प्रकल्प उभारणी करण्याकरीता सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
तसेच प्रकल्पाच्या फुटीमुळे झालेले नुकसान हे खुप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या नुकसान ग्रस्तांना त्वरीत तातडीची मदत मिळणे गरजेचे असून याबाबत आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांचीही भेट घेत भरीव मदत करण्याची मागणी केली.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दि.21 जुलै ते 26 जुलै 2021 या दरम्याने 1100 मि.मि. पाऊस पडला असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या (NDRF) च्या नियमानूसार धरण फुटी दिवशी कमीत कमी 65 मि.मि. पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे मेघोली प्रकल्प फुटीबाबत घडलेली घटना ही NDRF च्या नियामांमध्ये बसत नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी सांगितले त्यामुळे या करिता खासबाब म्हणून राज्यशासनाने या नुकसानग्रस्तांना मदत करणे गरजेचे आहे.
याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल राज्य शासनास प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत व प्रकल्पाच्या उभारणीस निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन निर्णय घेणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, संग्रामसिंह सावंत आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks