Breaking News : मणिपूरमध्ये दोन तरुणींचा बलात्कार करून खून

२२ जुलै, मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्काराची घटनेचा प्रकार उघडीस आल्यानंतर दोन महिलांवर बलात्कार करून खून करण्यात आल्याची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. या घटनेची मूळ तक्रार (झिरो एफआयआर) १६ मे रोजी सैकुल पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती.ही एफआयआर आता संबंधित पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.मृत तरुणींपैकी एका तरुणीच्या आईने ही तक्रार दाखल केली आहे.
इम्फाल पूर्वी येथील एका कार वॉशिंग कंपनीत या दोन तरुणी काम करत होत्या. या परिसरात त्या भाड्याने राहात होत्या. तेथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्दयरीत्या हत्या करण्यात आली, असे या तक्रारीत म्हटले आहे. १०० ते २०० जणांच्या जमावाने हा गुन्हा केला, असेही तक्रारीत नमुद आहे. काही दिवसांपूर्वी ही तक्रार पोरोपट पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. द इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.