ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री हसन मुश्रीफ यांनी आनूरमध्ये साजरे केले रक्षाबंधन……! १०० हून अधिक बहिणींनी भावाला बांधला अतूट भावबंधनाचा धागा

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आनूर ता. कागल या गावातच साजरे केले रक्षाबंधन. १०० हून अधिक बहिणीनी आपल्या या लाडक्या भावाला अतुट भावबंधनाचा हा धागा बांधला.

याबाबत अधिक माहिती अशी, आनूर ता. कागल येथे बांधलेल्या सैनिक भावनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ गावात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या आया-बहिणी त्यांना राख्या बांधल्या.

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माझ्या या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे. गेल्या ४० वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माझ्या लाडक्या माता- भगिनींचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावरच नेहमीच यशस्वी होत आलो आहे. असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

राख्या आणि ओवाळणी……..!
या कार्यक्रमासाठी गावातील शंभरहून अधिक माता भगिनी जमल्या होत्या. मंत्री श्री. मुश्रीफ यांना बांधण्यासाठी महिलांनी राख्या आणल्या होत्या पंचारतीने ओवाळून औक्षण करून आपल्या लाडक्या भाऊरायाचे माता-भगिनींनी रक्षाबंधन केले……!

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks