गारगोटी : गट-तट बाजूला ठेवून दूध संस्था व गोकुळचा विकास साधणार : संचालक रणजितसिंह पाटील

भुदरगड प्रतिनिधी : प्रकाश पाटील
पंचवीशे कोटीची रु वार्षिक उलाढाल असणारी गोकुळ ही आपली मातृसंस्था असून मी निवडणूकीत एका आघाडीतून विजयी झालो असलो तरी आता विश्वस्त म्हणून गट तट बाजूला ठेवून दूधसंस्था अन गोकुळच्या विकासासाठी अविरत प्रयत्नशील रहाणार असल्याची खात्री गोकुळ संचालक रणाजितसिंह पाटील यांनी दिली ते दूधसंस्था संपर्क दौऱ्यादरम्यान मडिलगे बु॥ येथे बोलत होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुनिलराव कांबळे यांनी केले.
यावेळी रणजितसिंह पाटील पूढे म्हणाले सामान्य दूधउत्पादकाच्या घराघराशी गोकुळचे नाते अतूट आहे.जिल्हयाच्या शिखर संस्थेवर परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वांनी पाठबळ दिले .म्हणूनच मी आज आपल्या समोर उभा आहे. आम्ही आपल्या श्रमाची,घामाची जाणीव ठेवून दूधलिटर मागे दोन रु आधिकचा भाव देवू केला आहे.यामूळे विश्वासाचे वातावरण तयार झालं म्हैस दूध वाढविण्यावर संघाने राबाविलेल्या योजनेचा लाभ घ्यावा.आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज योजना म्हैस खरेदी साठी असून जिल्हा बॅकेच्या माध्यमातून रु.पाचशेह कोटीची तरतूद केली आहे. हरियाना,गुजरात जातवंत म्हैस खरेदी करुन अनुदानाचा लाभ घ्यावा. सध्या संघाचे तेरा लाख लिटर दूध संकलन असून ते वीस लाख लिटर नेण्याचा आमचा मानस असून अमूल सारखी संस्था आपली स्पर्धक होत आहे हे रोखण्यासाठी दूध उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. जनावर संगोपनसाठी गोकूळचे ,पशुखाद्य,वैद्यकीय सेवा,वासरू संगोपन,अशा अनेकविध प्रभावी उपाय योजना राबवत असून त्याचा लाभ घ्यावा दूधाला योग्य भाव देवून आपल्या घामाला व श्रमाला न्याय देण्यासाठी मी अविरत प्रयत्नशील राहीन या तालूकयाचा एक संचालक म्हणून मी आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे. दूध उत्पादकाच्या जीवनात गोकुळच्या माध्यमातून स्थैर्य लाभणेसाठी आधिक योगदान देण्याची ग्वाही दिली.
यावेळी चार दिवसात पिंपळगाव,कडगांव,गारगोटी विभागातील बहूसंख्य दूधसंस्थाना भेटी देवून ठरावधारकाचे आभार व्यक्त केले
प्रसंगी बिद्री संचालक मधुआप्पा देसाई ,पंडीतराव केणे, विश्वनाथ कुंभार,धोड़ीराम वारके,के.ना.पाटील,बापूसो आरडे,विलास कांबळे दता पाटील,बाळासाहेब जाधव,संग्राम देसाई ,विठ्ठल कांबळे,संतोष मेंगाणे,प्रकाश पाटील आकूर्डे ,उदय पाटील,अशोक पाटीलआदी उपस्थित होत.
गोकुळच्या आर्थिक स्त्रोतातून राज्य सेवा परीक्षेत यश…
संपर्क दौऱ्यादरम्यान आपल्यास एक युवक भेटला तो म्हणाला दादा माझी घरची परिस्थीती बेताची आहे. माझ्या या एमपीएसई स्पर्धा परीक्षेच्या यशात दूग्धव्यवसायातून आर्थिक स्त्रोत मिळाले याचं सार श्रेय आई,बाबा व गोकूळला देतोय आपण संचालक आहात. ग्रामीण जनतेला हेच पाठबळ द्यावे अशी भुमिका त्यांनी मांडली.