शिंदेवाडी येथे ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या माध्यमातून जनजागृती

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचाव्यात या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा प्रारंभ कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे झाला .या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह मार्गदर्शन दाखवण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्यात आली .
सामान्य भारतीय केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री जन आवास योजना, विश्वकर्मा सन्मान योजना, प्रधानमंत्री स्वनिधी सन्मान योजना, मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आयुष्मान भारत योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी शिंदेवाडी गावच्या सरपंच रेखा माळी, उपसरपंच सुनीता पोवार ,ग्रामपंचायत सदस्य दत्तामामा खराडे, अविनाश गोसावी , अक्काताई वंदूरे , अधिकारी सुनिता राणे ,पंचायत समिती आरोग्य विभाग सुपरवायझर सुनिता नरदगे ,आरोग्य अधिकारी रुपाली लोकरे,भाजप तालुका समन्वयक जयवंत चौगले ,ग्रामसेवक विजय पाटील ग्रामस्थ रमेश माळी,तानाजी खराडे,विशाल आंगज, ओंकार मोरबाळे , सचिन शिंदे यांचेसह आरोग्य सेविका , आशा सेविका , अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.