म्हाळेवाडी ग्रामस्थांनी जपले सामाजिक बांधिलकेचे भान; वीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करुन वाढवली गावची शान

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
मौजे म्हाळेवाडी ता. चंदगड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळपासूनचं गावात आनंदी व उत्साही वातावरण होते.
भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे ज्यांनी १९७१ साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात हातात बंदूक घेवून निधड्या छातीने शत्रूवर हल्ला चढविलाव स्वतःच्या प्राणांचे बलिदान देवून देशसेवेसाठी म्हाळेवाडीचा मोहरा धारातिर्थी पडला…ते म्हणजे म्हाळेवाडी गावचे थोर सुपुत्र शहिद जवान लान्स नायक कै. मारुती रामू मडिलगेकर यांच्या वीरपत्नी श्रीम. सरस्वती मारुती मडिलगेकर… व १९८६ साली राज्यस्थानमध्ये आलेल्या जलप्रलयात अडकलेल्या हजारो नागरिकांना वाचवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता सर्वांत पुढे होवून आपल्या जीवाची बाजी लावून शेकडो नागरिकांना वाचवता वाचवता या जलप्रलयामध्ये म्हाळेवाडीचा आणखी एक मोहरा धारातिर्थी पडला…ते म्हणजे भारत सरकारच्या मरणोत्तर कीर्ति चक्राने सन्मानित झालेले शहिद जवान कै. शिवाजी कृष्णा पाटील यांच्या वीरपत्नी श्रीम. शोभा शिवाजी पाटील…या दोन वीरमातांच्या हस्ते या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ज्यांनी १९६५ व १९७१ साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढा देवून भारतमातेचे रक्षण केलं होतं…ते आदरणीय मारुती विठोबा पाटील व आदरणीय पोमाना भरमाना कोकितकर…या म्हाळेवाडीच्याच दोन माजी सैनिकांच्या शुभ हस्ते… या दोन वीरमातांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देवून यथोचित गौरव करुन म्हाळेवाडीकरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या शुभ कार्यक्रमा प्रसंगी आपल्याचं गावचा आणखी एक शूर सुपुत्र…जो भारतीय सैन्य दलात…कोब्रा कमांडो…म्हणून आपली देशसेवा बजावतो आहे…तो म्हणजे मारुती मायाप्पा दळवी…यांचाही रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करुन पुढील देशसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या…
* कु. नेहा संजय कानूरकर…हिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त My School आयोजित आँनलाईन भाषण स्पर्धेमध्ये नामांकन प्राप्त केल्याबद्दल…उपसरपंच विजय मर्णहोळकर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला…व तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या…*
*त्याचबरोबर…जिनं राष्ट्रीय शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात प्रथम क्रमांकाच्या यशोशिखराला घट्ट मिठी मारली…आणि आपल्या गावचे, तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकविले…अशी अभिमानास्पद कामगिरी करणारी आपल्या शेजारच्याच शिवणगे गावची गानकोकिळा…कु. सानिया धनाजी मुंगारे…हिचा एन. आर. पाटील सर यांच्या शुभ हस्ते या मंगलमय प्रसंगी म्हाळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला…व तिला भावी वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देण्यात आल्या…
तसेच…इंच इंच भूमी लढवून देशाच्या रक्षणासाठी असो किंवा देशावर आलेल्या अस्मानी संकटात असो…आपल्या प्राणांची बाजी लावणारे आपल्या गावचे शूर सुपुत्र…कै. मारुती मडिलगेकर व कै. शिवाजी पाटील…या दोन शहिद जवानांचा हृदयस्पर्शी, पराक्रमी व प्रेरणादायी इतिहास आम्हां सर्व गावकर्यांच्या मनांत सदैव स्मरणात राहिलं…
गावातील प्रत्येक घटकाला मान सन्मान देवून सर्वांना सोबत घेवून गावच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवणारे म्हाळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सी. ए. पाटील , उपसरपंच विजय मर्णहोळकर, ग्रा. पं. सर्व सदस्य, ग्रामसेवक रविराज चिलमी व सर्व ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन… ध्वजारोहणाच्या या सुंदर कल्पनेमुळे गावाची एका आदर्श व प्रेरणादायी दिशेने वाटचालीला सुरुवात झालेली आहे…
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सर्व सदस्य, ग्रामसेवक, श्री. वसंत पाटील सोा ( तंटामुक्तीचे अध्यक्ष ), मार्गदर्शक एन. आर. पाटील सर, . जगदिश पाटील ( पो. पाटील ), आजी व माजी सैनिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.