म्हाकवे : गोकुळ मार्फत लसीकरणाचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा ; गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सर्व दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघामार्फत लम्पी लसीकरणाचा लाभ घ्यावा. म्हाकवे (ता. कागल) येथे जनावरांना गोकुळ दूध संघातर्फे लम्पी लसीकरणाची सुरुवात करण्यात आले. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ बोलत होते.
पुढे नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ उत्पादक शेतकऱ्यांसोबत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे इतर जनावरांपासून वेगळी करावी. गोठ्याची साफसफाई, स्वच्छता करावी. गोचीड व माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावरांविषयी संघाकडे संपर्क साधावा. जनावरांवर उपचार करून घ्यावेत. गोकुळमार्फत सुरू असलेल्या लसीकरणाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांना करून घ्यावा. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे.
यावेळी रमेश पाटील एच एन पाटील गुरुजी, कृष्णात पाटील, गोरे सर, हिंदुराव पाटील, जीवन कांबळे, प्रकाश माळी, के.डी पाटील, निवास पाटील, विजय पाटील, पवन पाटील, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.