” मेहतर,रूखी,बाल्मिकी समाजाला (स्वतंत्र) आर्थिक विकास महामंडळ मिळावे.” – सुरेश तामोत

प्रतिनिधी
मेहतर,रूखी,बाल्मिकी समाज वंशपरंपरेने नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे याकरिता स्वतःच्या आरोग्याची परवा न करता मलमूत्र साफसफाई चे काम करत आहे.
कोव्हिड -19 संसर्ग जागतिक महामारीच्या धोकादायक परिस्थिती मध्ये देखील या समाजाने जीवाची पर्वा न करता नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही.
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून मेहतर,रूखी, बाल्मिकी समाजासह इतर अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजांनाही आर्थिक पुरवठा केला जातो.
त्यामुळे या समाजास योग्य प्रमाणात आर्थिक पुरवठा होत नाही. त्यामुळे या समाजाचा विकास खुंटला असून बेरोजगारीही वाढली आहे त्यामुळे हा समाज शैक्षणिक व आर्थिक स्तरावर मागासलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने लिंगायत, गुरव, रामोशी,वडार आणि ब्राह्मण या समाजांच्या कल्याणसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत त्या धर्तीवर मेहतर,रूखी, बाल्मिकी (स्वतंत्र)आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री,मा.एकनाथजी शिंदे आणि मा.मुकेश सारवान , राज्य समन्वयक मेहतर,रूखी,वाल्मिकी (स्वतंत्र)विभाग महाराष्ट्र राज्य (शिवसेना प्रणित) यांच्याकडे उपेक्षित दलित सामाजिक परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश तामोत यांनी केली आहे.