ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेघोली धरण फुटीत एक महिला चार म्हशी, एक बैल वाहून गेला तर शेतीची अपिरमित हानी

गारगोटी विशेष प्रतिनिधी : सुभाष माने 

१ स्पटेंबर २०२१ च्या रात्री साडेदहाच्या च्या दरम्यान सारे शांत असताना भुदरगड तालुक्यातील मेघोली चा लघु पाटबंधारे तलाव फुटला आणि या परिसाराला जबर तडाखा बसला. तलावाची गळती वेळेत काढली नसल्याने हा अनर्थ घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.तलावाच्या मुख्य गेटलाच भगदाड पडले व हा अनर्थ घडला.हा प्रकार रात्री घडल्याने मोठी जिवित हानी टळली पण झालेली ही घटना दुर्दैवी असून या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारी ठरली असल्याचे मत येथील जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.

भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव फुटला अशी बातमी रात्री अकरा च्या दरम्यान सोशल मिडियावर झळकू लागली आणि या परिसरातील आणि नदिकाठावरील गावचे अनेक लोक भयभित झाले.पाणी किती, कोठे आहे? याची विचारणा होवू लागली. मेघोली धरण फुटल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला.येथील स्थानिक रहिवाशी सांगतात की, पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की यामध्ये ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके वाहून गेली.यात मेघोली,नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ गावचे मोठं नुकसान झाले आहे.ओढ्याकाठची जमिन पिके वाहून गेली.वेंगरुळ, शेणगावात पाणी शिरले.
घटनास्थळी तहसिलदार अस्विनी अडसूळ यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले.चर्चेला उधान आले.

या धरण फुटीच्या पाण्याच्या प्रवाहात नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते(वय ५५) या महिला वाहून गेली.नंतर तिचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधून काढला.या दरम्यान सदर महिला व पती, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी काही जनावरे सोडली पण पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर पडले परंतु आपली आई वाहून गेल्याचे या मुलांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली ग्रामस्थही मदतीला धावले त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने मोठे नुकसान झाले.मोहिते आपल्या कुटुंबासह कसेबसे बाहेर पडले.परंतु त्यांची एक बैल तीन म्हेशी अशी चार जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडली आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरी कोसळली. काही मोटरसायकलीही वाहून गेल्या. मेघोली,नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ या गावात मेघोली प्रकल्प फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली रात्रीच्या झोपेत असणारे अनेक ग्रामस्थ ओढ्याच्या दिशेने धावले. पाणी पाहण्यासाठी नागरिकाने मोठी गर्दी केली होती. तलाव रात्रीचा फुटल्याने पाण्याच्या प्रवाहाचा आवाज तब्बल दोन किलोमीटरपर्यंत येत असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. ओढ्याचे आक्राळ-विक्राळ रूप पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले.

शेणगांव येथील नदीकाठावरील या पाण्याचे निरिक्षण करणाऱ्या एका जाणकार व्यक्तीने सांगितले की, रात्री सव्वाबाराला नदिपात्रात दहा फुट उंचीने पाणी वाढले. शेणगावात पाणी शिरले. पात्रातून ऊस पिक वाहून जात होते. पाण्याबरोबर केळीची झाडे, कचरा,लाकडे आदि वाहून जाताना दिसत होते.रात्री सव्वाएक नंतर पाणी उतरू लागले.वेंगरूळ गावात पाणी शिरले, शाळेजवळची गल्ली खाली केली लोकांना बाहेर काढले.शेळोलीच्या वक्रतुंड मत्स्यव्यवसाय संस्थेने हा तलाव मासेमारीसाठी घेतला होता.त्यांचे कित्येक लाखांचे नुकसान झाले.

तलाव रात्रीचा फुटल्याने नुकसानीचा नेमका अंदाज बांधता येत नव्हता परंतु या घटनेमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे हे मात्र नक्की.अशा तलावांची निर्मिती करताना मजबुतीकरणाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे.

संबधित बातम्या :

ब्रेकिंग न्यूज : मेघोली धरण फुटले; नदीकडील बाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

मेघोली धरण : एक महिला बेपत्ता,वाहून गेलेले चौघे जण झाडावर सापडले; चार जनावरे मृत

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks