ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कडगाव हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव मध्ये शालेय आरोग्य तपासणी संपन्न

कडगाव प्रतिनिधी :
कडगाव येथील कडगाव हायस्कूल व श्री . समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य विभाग मार्फत शालेय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. प्रारंभी मुख्याध्यापक डॉ. आर. डी. पोवार यानी तपासणी शिबिरा तील सर्व सदस्यांचे स्वागत केले. डॉ. सागर भोई, सारिका कुंभार, विद्या साठे, पुनम कोरे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या संबंधी सूचना आणि वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले. स्वागत आणि प्रास्ताविक ए.डी देसाई यांनी केले. शालेय आरोग्य तपासणी मध्ये 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आभार सी.एस. मासाळ यांनी मानले.