चंदगड : महावितरण वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याचे किर्तन सेवे दरम्यान आव्हान

चंदगड प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
महाशिवरात्री निमित्त मौजे केंचेवाडी हरीहर मंदिर येथे काला किर्तन सेवे दरम्यान वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याचे नम्र विनंती केली कीर्तनकार ह.भ.प.विठ्ठल महाराज फड यांनी(माझे वीज बिल माझी जबाबदारी) आहे असे सांगितले.
या दरम्यान औद्योगीक , वाणिज्य, घरगुती,शेतीपंप वीज ग्राहकांना सौर ऊर्जा संबंधि माहिती देऊन शेतकरयांना दिवसा वीज मिळण्यासाठी सौर ऊर्जा किती महत्त्वाची आहे हे सांगितले.तसेच नवीन विज कनेक्शन घ्या व वीज चोरी करू नका असे आवाहन केले.तसेच महावितरण कंपनीने ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा केली आहे त्याचा उपयोग करण्या संबंधी माहिती दिली.
या कार्यासाठी मला सतत प्रेरणा व मार्गदर्शन करणारे मा.मुख्य अभियंता सुनीलजी पावडे , अधिक्षक अभियंता पेटकर साहेब, पंढरपूर चे कार्यकारी अभियंता विजयजी पाटील , अतिरिक्त कार्यकारी अभियंता भोळे , उपकार्यकारी अभियंता बनसोडे ,वि.व.ले सुरवसे साहेब , गावडे साहेब, सहाय्यक लेखापाल बंकु जाधव साहेब व सर्व लाईन स्टाफ, जनमित्र बांधव यांचे ही सहकार्य लाभत आहे.