ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी (अराजपत्रित) गट-ब (PSI-STI-ASO) पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

राज्यातील अनेक होतकरु विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात, परंतु अनेकवेळा आर्थिक पाठबळ व कोचिंग अभावी होतकरु व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकवेळा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत. यासाठी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्याकरिता सारथीमार्फत एमपीएससी (अराजपत्रित) गट ब (PSI-STI-ASO) ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले आहे.

या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारर्थी मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने तज्ञ मार्गदर्शकांकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीव्दारे करण्यात येईल. सारथीने उपलब्ध करून दिलेल्या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks