हळदी गावातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथे हळदी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला . जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्कार्फ घालून त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला .
यावेळी नाथाजी पाटील यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सरकारी योजने संदर्भात माहिती दिली . पक्ष संघटनेचे काम करत असताना मी माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत सदैव पाठीशी राहीन अशी ग्वाही दिली . कागल तालुक्यामध्ये पक्ष संघटना व लोकांचा भाजपा बाबत वाढता प्रतिसाद पाहून येणाऱ्या 2029 सालच्या विधानसभेत भाजपचा उमेदवार निवडून येईल अशी भावना व्यक्त केली . तसेच शासकीय योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात व सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करावे असे आवाहनही त्यांनी केले .
गावातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करीत आहोत . इथून पुढे पार्टीच्या ध्येय धोरणानुसार काम करणार असल्याचे उत्तम व्हराबळे यांनी सांगितले .
कार्यक्रमास जिल्हा चिटणीस तानाजी कुरणे भाजप तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, सरचिटणीस रावसाहेब पाटील व अमर पाटील, सौरभ बेलेकर, संतोष मगदूम ,आदिनाथ भांडीग्रे ,अमोल व्हरांबळे , सुंदर जाधव , हळदी व मुरगूड गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुरगूड शहराध्यक्ष पृथ्वीराज कदम यांनी केले . व तर आभार मयूर सावर्डेकर यांनी मानले .