अंबाई टँक परिसरात मानसिंग बोंद्रे यांनी रिव्हॉल्वर मधून केला फिल्मी स्टाईल गोळीबार

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शेत जमिनीच्या आणि शिक्षण संस्था मालकीच्या वादातून गोळीबार केल्याचा प्रकार सोमवारी रात्री अंबाई टॅंक परिसरात घडला. याप्रकरणी अभिषेक बोंद्रे यानी दिलेल्या फिर्यादीवरून मानसिंग बोंद्रे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसरा चौक इथल्या शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या आणि शेतजमिनीच्या मालकीवरून बोंद्रे कुटुंबियांमध्ये वाद आहे.सोमवारी रात्री उशीरा अंबाई टॅंक परिसरात मानसिंग बोंद्रे यांनी आपल्या जवळ असलेल्या रिव्हॉल्वर मधून फिल्मी स्टाईलनं गोळीबार केला.गोळीबाराचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.दरम्यान आज अभिषेक बोंद्रे यांनी मानसिंग बोंद्रे यानी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत आपल्या दिशेने गोळीबार केला असल्याची फिर्याद दिल्यानंतर मानसिंग बोंद्रे यांच्याच विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.