मंडलिक महाविद्यालयाची कु. श्रध्दा सुतार राष्ट्रीय इंग्रजी घोषवाक्य स्पर्धेत ‘तृतीय’

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी दरवर्षी विविध क्षेत्रांत विविध स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेऊन आपली चुणूक दाखवित असतात. नुकत्याच पार पडलेल्या हरियाणामधील, कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी, कुरुक्षेत्र यांच्याशी संलग्नित दयाल सिंघ कॉलेज, करनाळच्या इंग्लिश लिटररी सोसायटीने ‘वर्ल्ड पीस’ या विषयावर
राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन, घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या तब्बल १२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यामध्ये कु. श्रद्धा अनिल सुतार (बी. कॉम्- भाग -१) हिला तृतीय क्रमांकाचे रक्कम रुपात बक्षिस व प्रमाणपत्र मिळाले. कु. श्रद्धा ही महाविद्यालयाच्या प्रॅग्मॅटिक इंग्लिश (स्पीकिंग) कोर्सची विद्यार्थिनी व उच्च महत्वाकांक्षी विद्यार्थी संघटनेची सदस्या आहे. तिच्यासोबत सहभागी स्पर्धकांना दयाल सिंघ कॉलेज, करनाळ यांच्याकडून सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहेत. या सर्व स्पर्धकांना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, उपप्राचार्य व सर्व स्टाफ यांनी कु.श्रद्धा हिचे अभिनंदन केले. तसेच, मुरगूड परिसरात तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.