मल्हार सेनेचे अध्यक्ष शहाजी सिद यांच्याकडून पूरग्रस्त मुलांना खाऊ वाटप.

घुणकी :
कोल्हापूरची पंचगंगा व वारणा नदीला महापूर आल्याने या पुराचा फटका नदी काठच्या सर्व गावांना बसला आहे. त्यामुळे घुणकी गावातील दलित नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक पूर बाधित कुटुंबांना गावातील मराठी शाळेत स्थलांतरीत करावे लागले असून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय ग्रामपंचायत मार्फत केलेली आहे. पण काही माणुसकीच्या नात्याने पुढे येऊन या पूरग्रस्त नागरिकांना धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मल्हार सेनेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ( शरदचंद्र पवार गट) कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या लहान मुलांना खाऊ वाटप केला. आणि त्यांनी आणखी काही मदत लागल्यास तत्काळ संपर्क करा असे आवाहन केले.
यावेळी गोपीचंद पडळकर यांचे स्विय सहाय्यक अण्णा सिद, संजय गुरव, आदित्य सिद धीरज सिद जालिंदर सिद, जालिंदर जाधव, गौतम कांबळे, सुभाष माने, सुरेश कांबळे,पत्रकार सचिन कांबळे उपस्थितीत होते.