समृद्ध शिक्षक बनवणे काळाची गरज : डॉ. सुनीलकुमार लवटे

गारगोटी प्रतिनिधी :
गारगोटी पंचायत समिती शिक्षण विभाग व भुदरगड तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “समृद्ध शिक्षक अभियान” च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलकुमार लवटे बोलत होते.
कोरोनाचा काळ हा शिक्षण क्षेत्राला सुद्धा आव्हानात्मक होता. मुलांच्या आणि शिक्षकांच्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम झाला आहे. अशा वेळी शिक्षकांनी समृद्ध बनवणे गरजेचे आहे, असे मनोगत लवटे यांनी व्यक्त केले.
पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांनी सुरू केलेल्या “समृद्ध शिक्षक अभियाना”चे डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी कौतुक केले.
हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू होणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमासाठी मराठी लेखक विश्वास सुतार, प्राध्यापक डॉ. मंजुषा माळी, प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी अरुण पाटील व भुदरगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक दीपक मेंगाणे यांनी केले तर सूत्रसंचालन ए. बी. पवार यांनी केले व आभार प्रदर्शन एस. पी. गुरव यांनी केले.