कोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा 6% सवलतीचे शेवटचे राहिले दोन दिवस

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंजूर धोरणानुसार दिनांक 30 जुन 2021 अखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये 6% सवलत देण्यात येते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे व आर्थीक उत्पन्नाचे स्तोत्र मर्यादीत राहिले. त्यामुळे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नागरीकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत 6% सवलत योजनेला मुदतवाढ दिलेली आहे. या सवलत योजनेचे शेवटचे तीन दिवस राहिलेने या योजनेचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
दिनांक 1 एप्रिल ते 28 जूलै 2021 अखेर रु. 19,64,18,711/- जमा
दिनांक 1 एप्रिल ते 28 जूलै 2021 अखेर 6% सवलत योजनेमधून महापालिकेच्या तिजोरीत रुपये 19,64,18,711/- रुपये जमा झालेले आहेत. यामध्ये गांधी मैदान नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.2,31,00,980/-, छत्रपती शिवाजी मार्केट नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.1,87,71,510/-, राजारामपूरी नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.3,13,73,755/-, छत्रपती ताराराणी मार्केट नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.4,17,70,939/-, महापालिका मुख्य इमारत नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.3,20,37,133/-, कसबा बावडा नागरी सुविधा केंद्रामध्ये रु.32,19,650/- अशा सहा नागरी सुविधा केंद्रामध्ये रु. 15,02,73,967/- जमा झाले आहेत. तसेच ऑनलाईन रु.4,61,44,744/- (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) जमा झाले आहेत. नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन असे मिळून रु.19,64,18,711/- रुपये जमा झालेले आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना घेता यावा यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे शनिवार दि.31 जुलै 2021 रोजी सुट्टी दिवशीही सुरु ठेवली आहेत.