गडहिंग्लज : केंद्रशाळा हिडदुगी तेथे तृणधान्य मार्गदर्शन

गडहिंग्लज प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
केंद्रशाळा हिडदुगी येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता निर्माण व्हावी निरोगी जीवनशैली साठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक अशा तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे वरी,नाचणी ,राजीग्रा ,राळा बाजरी ,यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचा समावेश नियमित आपल्या घरी तसेच शालेय पोषण आहारात होणे गरजेचे असल्याचे मत आयोजित तृणधान्य महोत्सवानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शनावेळी कृषी सहाय्यक व्ही.आर .गुजर यांनी सांगितले .
त्याचप्रमाणे श्रीमती डी आर कुंभार यांनीही मुलांना आपल्या निरोगी आयुष्यासाठी आपल्या आहारात तृणधान्यांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच एच टी सिताफ यांनी तृणधान्यांच्या वापरावी होणारी हाडांचे ठिसूळता रोखायची असेल तर आहारात अशा प्रकारच्या दुरापास होत चाललेल्या तृणधान्याचा समावेश करण्याविषयी प्राधान्याने पालकांच्या मध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
केंद्रप्रमुख व केंद्र मुख्याध्यापक विकास पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाबुराव सुतार तसेच निरंजन देसाई यांनी मार्गदर्शक कृषी सहाय्यकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सहाय्यक शिक्षक दयानंद खतकर यांनी सर्वांचे आभार मानले.