ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपला; पुरोगामी चळवळीचं वादळ शांत : प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर :
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रा. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खास वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. प्रा. पाटील गेल्या दोन वर्षांपासून घरीच होते.