शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना संयुक्त उत्तरेश्वरपेठ वतीने गरीब गरजूंना अन्नदान वाटप

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेसो यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून शिवसेना संयुक्त उत्तरेश्वरपेठ शुक्रवार पेठ रंकाळा विभागाच्यावतीने गरीब गरजू लोकांना उत्तरेश्वर थाळी या उपक्रमाअंतर्गत अन्नदान करण्यात आले
यावेळी संजय गांधी निराधार योजना उत्तर चे मा. अध्यक्ष किशोर घाटगे यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची राज्यातील शेवटचा माणूस उपाशी राहता कामा नये या हेतूने झुणका-भाकर योजना शिवशाहीचे सरकार आल्यावर चालू केली होती त्यांचा हाच वारसा पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी चालवला असून शिव भोजन ही योजना सुरु केली आहे
कोरोना काळापासून कोल्हापुरात येणारा कोणताही गरीब व गरजू उपाशी राहू नये या हेतूने सुरू असलेली उत्तरेश्वर थाळी हा कौतुकास्पद उपक्रम असून शिवसेनाप्रमुखांना हीच खरी आदरांजली आहे
यावेळी रियाजभाई बागवान शिव अल्पसंख्याक सेना कोल्हापूर सांगली जिल्हा संपर्कप्रमुख, किशोर माने, राकेश पोवार, धनाजी कारंडे ,इमरान अत्तार, यांच्या हस्ते अन्न वाटप करण्यात आले.यावेळी योगेश मांडरेकर, संदीप घाडगे ,प्रशांत पवार, फारुख चौगुले, साबीर उस्ताद, अभिजित कदम, सम्राट शिर्के, रोहन गवळी, दादू शिंदे, महेश अणावकर, अजिंक्य कदम , आधीसह कार्यकर्ते उपस्थित होते.