ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड : वीर शिवा काशिदांचे स्वराज्य रक्षणार्थ दिलेले बलिदान इतिहास कधी विसरणार नाही : वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

छत्रपती शिवरायांच्यासाठी हसत मुखाने मृत्यूला कवटाळून हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या नेपापूरच्या वीर शिवा काशिद यांना इतिहास कधीच विसरणार नाही . स्वामीनिष्ठा , त्याग आणि बलिदान यासाठी वीर शिवा काशीद इतिहासात अजरामर राहतील . असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी केले . ते मुरगूड ता.कागल येथे मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या वतीने आयोजित वीर शिवा काशीद पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार हे होते . तर माजी नगरसेवक विशाल सुर्यवंशी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी बोलतांना नगरध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले , लाख मेले तरी चालतील , पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे . या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवरायांसाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणारे शिवा काशिद खरे स्वराज्य रक्षक होते .

प्रारंभी वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचे हस्ते करण्यात आले . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .

स्वागत प्रास्ताविक मुरगूड शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण रणवरे यांनी तर आभार सचिन कोरे यांनी मांडले .वीर शिवा काशिद समाजमंदीर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जोतीराम रणवरे, अनिल रणवरे, बाजीराव रनवरे , संजय रनवरे, जोतीराम पोवार , सचिन रणवरे , नामदेव माने , अमोल रणवरे, सचीन माने ,प्रसाद कमळकर , संदीप रणवरे , चंद्रकांत माने,विलास रणवरे , विशाल माने , सचीन रनवरे , रामचंद्र शिंत्रे, गुरु माने ,अथर्व रनवरे, गुंडा माने , आदी समाज बांधव उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks