भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे पूरग्रस्तांना महाडीक परिवाराचा मदतीचा हात; ८०० सिमेंट पोत्यांचे पूरग्रस्तांना कृष्णराज महाडिक यांच्याकडून वितरण.
शेणगांव ता. भुदरगड येथे पुरामुळे पडझड झालेल्या घरांसाठी कृष्णराज महाडिक यांनी आपल्या स्वतःच्या युट्युब चॅनेल मधून येणाऱ्या महसुलातून ८०० पोती सिमेंट मदत म्हणून देऊ केली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवली की महाडीक कुटुंबीय सर्वप्रथम मदतीला धावून जाणारे जिल्ह्यातील एकमेव कुटुंब असल्याचे उद्गार युवा नेते कृष्णराज धनंजय महाडिक यांनी काढले; भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे पूरग्रस्तांना मदत वाटप प्रसंगी ते बोलत होते. देवराज बारदेसकर प्रमुख उपस्थितीत होते.

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे नुकत्याच आलेल्या पुरामुळे बेघर झालेल्या कुटुंबियांना युवा नेते कृष्णराज महाडिक यांचे हस्ते घरे बांधण्यासाठी तब्बल ८०० सिमेंटच्या पोत्यांचे त्यांचे हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले, कोणत्याही प्रकारची नैसर्गिक अथवा कोणतीही आप्पत्ती आली की महाडिक कुटुंब मदतीसाठी धावून येते. भुदरगड तालुक्यातील शेणगाव सह १३ गावात सिमेंट पोती देण्यात आली असून भविष्यातही जीवनावश्यक साहित्य अपतिग्रस्त कुटुंबियांना देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
देवराज बादेस्कर यांनी संसदरत्न माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचा वसा व वारसा महाडिक कुटुंबियांतील कृष्णराज महाडिक यांनी जपला आहे. शेणगाव ग्रामस्थांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावल्या या हातांना शेणगाव ग्रामस्थ विसरणार नाहीत असे गौरवोद्गार काढले.
यावेळी अनेक पूरग्रस्त महिलांनी जिल्ह्यात सर्वात प्रथमच प्रत्यक्षात मदत केल्याची भावना व्यक्त करत महाडिक कुटुंबियांचे आभार मानले.
यावेळी मानसिंग तोरसे, राजेंद्र शिंदे, सुनिल कोरे, शुभम वायचळ, ओंकार विभूते यांचेसह धनंजय महाडिक युवाशक्तीचे विजयबाबा महाडिक, नंदकुमार शिंदे, शक्तिजीत पोवार, पार्थ सावंत, तुकाराम देसाई, प्रविण आरडे, किरण खेडकर, विनोद जाधव, पांडुरंग गुरव, धनाजी देसाई, शशिकांत पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.