किल्ले भुदरगड वर मडिलगे हायस्कूल मडिलगे बु! ची सामाजिक सहल

गारगोटी :
मागील दोन वर्षांमध्ये कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालय काही भरले नाही. पण कालांतराने कोरानोचा कमी होत चाललेला प्रादुर्भाव पाहून सरकारने शाळेची घंटा वाजवली. व महाराष्ट्रातल्या शाळा भरल्या शाळा भरल्यापासून विद्यार्थ्यांना अध्यापन व अध्यायन हा शिक्षणक्रम सुरू होता. पण मुलांना थोड्या वर्ग खोलीचे अध्यापनातुन बाहेर काढून किल्ले भुदरगड मध्ये प्रत्यक्षदर्शी अध्यापन व सामाजिक सहलीचे नियोजन आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी. शालेय आंतरवासिता टप्पा २ व मडिलगे हायस्कूल, मडिलगे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने ही सामाजिक सहल आयोजित केली होती. या सामाजिक सहलीसाठी मडिलगे हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रा.डॉ.ए.एम.पाटील,सहा शिक्षक यु.ह्वी.शिगावकर,एस.एस.खोत,एस.ह्वी.ढेंगे,बी.एस.चौगले,एस.सी.कल्यानकर,ह्वी.पी.तिकोडे,शालेय आंतरवासीतेच्या मार्गदर्शिका सौ.प्रा.डॉ.एम.एन.मोरे व शालेय आंतरवासीतेचे सर्व छात्र शिक्षक व शिक्षिका यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी बीएड भाग दोनच्या अभ्यासक्रमांतर्गत शालेय आंतरवासिता साठी मडिलगे हायस्कूल मडिलगे बुद्रुक येथे एक युनिट आपल्या अंतर्वा सीतेची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक १३-१२-२०२१ पासून कार्यरत आहे. यामध्ये शालेय आंतरवासिता च्या छात्र शिक्षक अध्यापन अध्ययन कार्यक्रमाबरोबरच शिक्षक पूरक संस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रम घेत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सामाजिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अंतरवासीतेच्या मार्गदर्शिका सौ.प्रा.डॉ.एम.एन.मोरे,आंतरवासीतेचे छात्र मुख्याध्यापक कृष्णात कांबळे,छात्रउपमुख्याध्यापक अस्मिता पाटील यांनी मार्गदर्शन केले.
गडावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांना एका रांगेत उभे करण्यात आले व सामाजिक सहलीची पार्श्वभूमी सांगण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा मडिलगे हायस्कूल मडिलगे चे सहाय्यक शिक्षक यु व्ही सीगावकर यांनी गडाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. शालेय आंतरवासिता च्या मार्गदर्शिका सौ.प्रा.डॉ.एम.एन.मोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन केल्यानंतर प्रा.डॉ.एम.एन.मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये ही सामाजिक सहल काढण्याचा उद्देश स्पष्ट करून, विद्यार्थ्यांनी या गडावरून काय घेऊन जायचे आहे याचे मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रा.डॉ.ए.एम. पाटील यांनी आपले विचार मांडताना त्यांनी भुदरगड किल्ल्याचा इतिहास विद्यार्थ्या समोर मांडला. इतिहास विशद करत त्यांनी या किल्ल्याचे इतिहासातील स्थान सांगितले. व त्याचे महत्त्व विशद केले.
प्रमुख मार्गदर्शकांची मनोगते झाल्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आंतरवासिता वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गांना सोबत घेऊन गडाची संपूर्ण स्वच्छता केली. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर किल्ले भुदरगड या किल्ल्याची भ्रमंती करण्यात आली. भ्रमंती करताना प्रत्येक अंतरवासीतेच्या वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गाला गडकोट संवर्धनाचे महत्त्व पटवून देत किल्ल्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या भ्रमंतीसाठी मडिलगे हायस्कूल मडिलगे चे मुख्याध्यापक प्रा.डॉ.ए.एम पाटील हे प्रत्यक्ष रित्या अध्यापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत होते.
गडाची भ्रमंती झाल्यानंतर सहभोजनाचे नियोजन करण्यात आले. नियोजन शाळेचे सहाय्यक शिक्षक बी.एस.चौगुले सर व शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी तसेच आंतरवासिता च्या छत्रशिक्षकांनी केले. या संपूर्ण सहभोजनाचा आनंद हा गडाचे सौंदर्य वाढवणारा होता. विद्यार्थ्यांना सहभोजन वाढण्यासाठी शिक्षक व शिक्षकांना सहभोजन वाढण्यासाठी विद्यार्थी हा शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थी शिक्षक संबंध येथेही दिसून येत होता.
सहभोजन झाल्यानंतर शालेय आंतरवासिता छात्र शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ यांच्या वरील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ यांच्या जीवनावर प्रेरणा टाकणारे गीत सादर केले. गीत सादर झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असते निसर्गाची काळजी घेणे व त्याचे संवर्धन करणे. प्लास्टिक मुळे होणारे परिणाम लक्षात घेऊन इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने मला बाजाराला जायचं नाही ग बया…. हे पथनाट्य सादर करून प्लास्टिक वर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. पटनाट्य झाल्यानंतर अश्विनी बिरंबोले या चिमुकल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने सदाबहार नृत्य सादर केले. तिचे नृत्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. नृत्य झाल्यानंतर मैत्री हा एक अविस्मरणीय धागा असतो. या पारदर्शक धाग्याचे महत्व विशद इयत्ता सातवीच्या मुलींनी मैत्रीसंबंध विशद करणारे गीत सादर करून संबंधित लोकांमध्ये मैत्रीच्या नात्याची ऋणानुबंध जागे केले.
गड किल्ले म्हटल्यावर मावळे आलेच आणि मावळे म्हटल्यावर मराठ्यांचा मर्दानी खेळ आलाच पन्हाळ्याचा इतिहास आपण ऐकलाच असेल, पन्हाळ्याचा इतिहासामध्ये एक नाव आजही तिथल्या माती मध्ये गजबजत असते ते म्हणजे बाजी.. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे… पावनखिंडीमध्ये घडलेल्या इतिहासाची सर्वांची आठवण करून देते आणि बाजी म्हटले की दानपट्टा आलाच शाळेचे सहाय्यक शिक्षक बी. एस. चौगुले यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा सांगत दानपट्टा सादर करणारे मल्ल आपल्या शाळेमध्ये घडवले आहेत. याचे प्रत्यक्षदर्शी अध्यायनच आज घडले इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दानपट्टा ही कला प्रदर्शित करून वीर बाजी प्रभु देशपांडे यांचा इतिहास मांडला. तसेच चौगुले सरानीही आपल्या शैलीमध्ये दानपट्टा या मर्दानी खेळाचा प्रासंगिक अनुभव देऊन उपस्थित लोकांच्या नजरा घेरुन धरल्या.
शालेय आंतरवासिता ची सामाजिक शास्त्र मंडळ प्रमुख अनिल वारके यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना घेऊन गड संवर्धन जोपासणे या विषयी पथनाट्य सादर केले स्वतः अनिल वारके यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून हे पथनाट्य सादर केले. या पटनाट्य मध्ये शिवरायांनी गडकोट याची निर्मिती का केली? त्यांना या गडाची निर्मिती करताना कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागले. त्या गडकोट साठी आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांना कशाप्रकारे गमवावे लागले. हे प्रत्येकदर्शी दाखवले तसेच दुसऱ्या पर्वामध्ये आजच्या गडकोटांची परिस्थिती कोणत्या मार्गावर आहे. याची वास्तवदर्शी अध्ययन या पथनाट्यातून घडवून आणले. ही पथनाट्य पाहून समोर उपस्थित असणाऱ्या शिवप्रेमींची डोळे अक्षरश पानाऊन गेले खऱ्या अर्थाने या पटनाट्य मधून आपण गड संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.
कला ही जन्मजात कोणामध्ये विकसित नसते, ती आपल्याला आत्मसात करावी लागते. असेच एक सहचारी उदाहरण किंवा या सहलीचे लक्ष वेधून घेणारे दृष्य म्हणजे मडिलगे हायस्कूल मडिलगेचे सहाय्यक शिक्षक व चौगुले व शिगावकर यांनी आपल्या कला मधून सर्वांचे मन वेधून घेतले. शेगावकर यांनी आपल्या मधुर आवाजातून सर्वांचे मन वेधून घेत, दोन सदाबहार गीते प्रसारित केली. त्याचबरोबर शालेय आंतरवासिता मार्गदर्शिका प्रा. डॉ मोरे मॅडम यांनी मराठी साहित्याचा आस्वाद देत एक सदाबहार गीत विद्यार्थ्यांसमोर मांडले. मोरे मॅडम यांच्या गीतानंतर शालेय आंतरवासिता चे मुख्याध्यापक कृष्णात कांबळे यांनी घटनाकार बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत एक भीम गीत सादर केले सहाय्यक शिक्षक चौगुले यांनी आपली दुर्मिळ होत चाललेली कला कटपुतली यांचा खेळ विद्यार्थ्यांसमोर मांडला व एका कोळी गीतावर पुतळ्यांचे नृत्य सादर केले कटपुतली यांचे नृत्य पाहून चौगुले सर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय छात्र शिक्षिका अस्मिता पाटील यांनी केले अशाप्रकारे मडिलगे हायस्कूल व शालेय आंतरवासिता यांच्या संयुक्त विद्यमानाने आज किल्ले भुदरगड वर सामाजिक सहलीचे नियोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी हायस्कूल मडिलगे चे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शालेय आंतरवासितीच्या मार्गदर्शिका, छात्रशिक्षक, छात्र शिक्षिका व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सहलीची सांगता मडिलगे हायस्कूल मडिलगे ची सहायक शिक्षक श्री सावंत सर यांनी आभार व्यक्त करून केली.