ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

LPG : घरगुती वापराचा सिलिंडर ५० रुपयांनी महागला, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ सामान्यांना झटका !

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता सामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे. ८ एप्रिलपासून गॅस सिलिंडर १० किंवा २० नाही तर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सरकारने घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ५५३ रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपये इतका झाला आहे. ८ एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय किंमती वाढत आहेत. त्यामुळे ८ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये ५० रुपयांची वाढ केली जाते आहे. स्वयंपाकाला लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे.घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. आज म्हणजेच सोमवार ७ एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी ८०२.५० रुपये होती, ती आता ८५२.५० रुपये होईल.

सरकारने मागील वर्षी म्हणजे ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती. १ एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ४४.५० रुपयांची कपात केली होती. दिल्लीत त्याची किंमत ₹४१ ने कमी होऊन ₹१७६२ झाली. पूर्वी ते ₹१८०३ मध्ये उपलब्ध होते. कोलकातामध्ये ते ₹४४.५० ने कमी होऊन ₹१८६८.५० रुपयांना मिळत आहे, पूर्वी त्याची किंमत ₹१९१३ होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks