अनंतशांती सामाजिक संस्थेला लोट्स वर्ड्स टॉप टॅलेंट पुरस्काराने सन्मानित

कुडूत्री प्रतिनिधी :
जीवन जगत असतांना समाजात अशा काही संस्था आहेत त्या नुसत्या समाज सेवेसाठी आपले योगदान देतात अशीच एक समाजसेवेने ओतप्रोत भरलेली संस्था म्हणजे अनंतशांती संस्था होय. सामाजिक क्षेत्रातील टॉप कामाची दखल घेत नुकताच अनंतशांती संस्थेला लोटस वर्ड टॉप ट्यालेंट मानाचा पुरस्कार मिळाला. आज पर्यंत संस्थेला १५० च्या आसपास पुरस्कार जाहीर झाले आहेत.
गेली १३ वर्षे विविध उपक्रम राबवत अनंतशांती सामाजिक संस्था राज्यभरात नावारूपास आली आहे.नुसते नाव मिळवणे हा उद्देश नसून समाजासाठी कांम करण्याची तळमळ अनंतशांतीच्या प्रत्येक कामातून व्यक्त होते.संस्थेने १३ वर्षाच्या कालावधीत समाज उपयोगी कार्यक्रम राबवलेत आणि जनतेतून कौतुकास पत्र देखील ठरले आहेत. झाडे लावा – झाडे जगवा,विविध रोग आणि मार्गदर्शन,व उपचार, दुर्गम व डोंगराळ भागातील शालेय विद्यार्थ्यांना,शालेय साहित्य वाटप,कोविड काळात राधानगरी,कागल,करवीर,गगनबावडा आदी तालुक्यात जनजागृतीसाठी माहिती पत्रके व प्रबोधन,व आर्सेनिक १ लाख डब्यांचे,(गोळ्यांचे) वितरण,विस हजार मास्कचे वाटप,१०००हजार व्यक्तींना फूड पॅकेट वाटप,कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, ग्रामपंचायत,डॉक्टर, आशा,आरोग्यसेवक,पत्रकार,अंगणवडी सेविका,आदींना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान त्याचबरोबर वनदिन संवर्धन दिना निमित्य वृक्षारोपण व झाडे वाटप,काडसिद्धेश्वर महाराज यांच्या संकल्पनेतून कोरोना प्रतिबंधक काड्याचे वितरण,त्यामध्ये यळगुड,खुपिरे,अर्जुनवाडा, क!!वाळवे,पालकरवाडी,आणुर धनगरवाडा, कोल्हापूर शहर,आदी गावातील तीस हजार नागरिकांनी या काड्याचा लाभ,घेतला,पूरग्रस्त यांना मदतीचा हात अशा या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुरस्कार बहाल करण्यात आला.
या पुढेही आम्ही समाजासाठी कायम धडपडत राहून जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी सदैव सेवेत राहून आमच्या अनंतशांतीच्या अध्यक्षा,सचिव,सर्व सदस्य,पुरस्कार वितरण समिती,यांचे ही मोलाचे योगदान लाभेल यात तिळमात्र शंका नाही असे भगवान गुरव साहेब यानी सांगितले.