लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्यास कुस्तीत तीन पदके

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोटा (राजस्थान) येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलाच्या कुस्तीगीर गौरी मधुकर पाटील हिने ५० किलो वजन गटात व तन्वी गुंडेश मगदूम हिने ५९ किलो वजन गटात रौप्य, तर रोशनी ज्ञानेश्वर बोडके हिने ६८ किलो वजन गटात कास्यपदक पटकावले. मंडलिक आखाड्याने तीन पदके मिळवत ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राला सांघिक तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
त्यांना एनआयएस आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासोा लवटे, माजी नगराध्यक्ष वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन, तर माजी खा. संजयदादा मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह आण्णासोो थोरवत, डॉ. प्रशांत अथणी (निपाणी), जय शिवराय एज्युकेशन सोसायटी व मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले.