गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा खून प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा द्यावी; परीट समाजाने निवेदन देऊन केली मागणी

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
लग्नासाठी मागणी घातलेनंतर मुलीच्या आईने लग्नास विरोध केल्याच्या रागातून लता महादेव परीट वय 42 वर्ष रा आल्याचीवाडी या महिलेचा येथील गुरुप्रसाद देवराज माडभगत वय 23 वर्ष या तरुणाने खून केला असून या आरोपीला कठोर शिक्षा देऊन हि समाजाला काळिमा फासणारी घटना आहे तरी कुटुंबावर झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन आजरा पोलीस ठाणेचे स पो नि सुनील हारुगडे याना गडहिंग्लज ,आजरा,चंदगड परीट समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी रामचंद्र परीट(अध्यक्ष ),शशिकांत परीट( सदस्य),राजेंद्र परीट(माजी जी प सदस्य ) तसेच तिन्ही तालुक्याचे पदाधिकारी ,सदस्य हजर होते.