गुन्हाताज्या बातम्या
कागल तालुक्यातील चिमगाव येथे विनापरवाना बनावटीची दारू बेकायदेशीर विक्री करणाऱ्याला अटक; मुरगुड पोलिसांची कारवाई

मुरगुड प्रतिनिधी :
चिमगाव (ता.कागल) येथे मुरगुड-गंगापूर मार्गावर घराच्या आडोशाला उघड्यावर गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर विक्री करताना अनिल सदाशिव सडोलकर यास मुद्देमालासह मुरगूड पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एकूण 7920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचा गुन्हा दाखल पोलीस कुंभार यांनी केला तर अधिक तपास पोलीस पाडळकर करत आहेत.