जिल्हापरिषद सदस्य कालावधीत सर्वाधिक निधी खेचून विकासकामे मार्गी लावण्यात अग्रेसर : जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील
येत्या काही दिवसांत जीवन पाटील कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

कूर :
आतापर्यंतच्या माझ्या जिल्हापरिषद काळात ६५ जिल्हापरिषद सदस्यांमध्ये मी विकासकामांमध्ये सर्वात जास्त विक्रमी १८ कोटी रुपयांची विकास कामे मंजुर करण्यात अग्रेसर राहीलो आहे. मतदार संघात प्रचंड असा विकास निधी लावुन मतदार संघाचे रूपच बदलुन टाकले आहे.त्यामुळे विकास कामे व तुमच्या आमच्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आकुर्डे मतदार संघात जिल्हापरिषदेला जनतेची सेवा करण्यासाठी जनताच पुन्हा संधी देईल असे प्रतिपादन जिल्हापरिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले. ते कुर (ता-भुदरगड)येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पाटील पुढे म्हणाले मतदार संघात विकास कामे वाड्या-वस्त्यापर्यत पोहचल्यामुळे घराघरात सर्वसामान्यांशी नाळ जुळली आहे. तसेच पालकमंत्री नाम.सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील येणारी जिल्हापरिषद काँग्रेसमधुन लढणार आहे व पक्ष वाढिसाठीही प्रयत्नशील राहणार आहे.तसेच मतदार संघात विकास गंगा ही अशीच पुढे नेण्यासाठी व जनतेची सेवक म्हणून सेवा करण्यासाठी आपण तत्पर असुन जिल्हापरिषदेला पुन्हा संधी द्या व या संधीचे हा जीवन नक्कीच सोन केल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी या पत्रकार परिषदेस कुरचे माजी सरपंच संदीप पाटील, युवराज कांबळे आदि सह पत्रकार उपस्थित होते.
स्वागत सुभाष माने, प्रास्ताविक बी.के.कवडे यांनी तर आभार नामदेव पाटील यांनी मानले.