स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; प्राथमिक व माध्यमिक विभागातील 49 गुरुजनांचा होणार सन्मान

कागल प्रतिनिधी :
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 73 व्या जयंतीचे औचित्य साधून स्व.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2021ची घोषणा राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केली .यावेळी शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी त्या म्हणाल्या,स्व.राजेसाहेब याना शिक्षणा बद्धल अमाप प्रेम होते.म्हणूनच आम्ही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाना त्यांच्या नावाने पुरस्कार देणेची प्रथा सुरू केली आहे.आज स्व.राजेसाहेब यांच्या जयंती चे निमित्ताने आम्ही पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर करीत आहोत
शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या पुरस्कारांची सुरुवात केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या कार्याचा सन्मान व्हावा व इतरांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने हे पुरस्कार सुरू केले आहेत. कागल, करवीर,आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शिक्षकांमधून या पुरस्काराची निवड करणेत आली असून. प्राथमिक विभागाकडील 29 तर माध्यमिक विभागाकडील 20 अशा 49 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सन्मानचिन्ह मानपत्र व कोल्हापुरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक शिक्षिकांचा सपत्नीक व सहपती सत्कार करण्यात येणार आहे.
शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभ हस्ते सन 2020 व 2021 या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे समारंभपूर्वक
पुरस्कार वितरण कोरोना चा प्रादुर्भाव कमी होताच केले जाणार आहे .तारीख व ठिकाण पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लवकरच कळवीत आहोत.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
प्राथमिक शिक्षक विभाग
भिकाजी धोंडीराम संकपाळ शेंडूर,पुनम महादेव चौगले बेलवळे बुद्रुक, छाया मधुकर चौगले म्हाकवे,जितेंद्र जयराम कुंभार हमिदवाडा, जगदीश विष्णु कांबळे सावर्डे बुद्रुक,गुरुराज बसवराज हिरेमठ सुळकुड,
दादासो बाबुराव कुंभार चिखली,सौ. रेवती रावसाहेब पाटील भादवन ,संजय शामराव खुडे वडगाव,सुनील आनंदा जाधव बेनिक्रे,पंडित हरी सुतार करंबळी, संदीप हरी मगदूम बामणी,भरत शिवाजी भोई मुरगुड,
श्रद्धा कशिनाथ विभुते मांगनूर,रघुनाथ बळवंत पाटील नंदगाव, पद्मजा तानाजी मेढे गिरगाव,
सुजाता संतोष बिल्ले लिंगनूर कसबा नूल ,सौ. सविता सचिन संकपाळ कागल,शितल महादेव खापरे कागल,अश्विनी रणजीत सणगर कागल, श्री संजय तुकाराम चाळक शिपुर तर्फे आजरा,महानंदा शशिकांत मनगुळे गडहिंग्लज,
सुभाष आप्पासो केसरकर सोहाळे,सौ शिला सुरेश देसाई उत्तुर.
आदर्श विस्तार अधिकारी शिक्षण
बंडोपंत शंकर संकेश्वरी कोगनोळी
शिष्यवृत्ती विशेष पुरस्कार
प्रदीप चंद्रकांत जाधव साके
प्रकाश सखाराम सोनाळकर बाचणी
आदर्श मुख्याध्यापक
केशव तुकाराम कांबळे बेलवळे बुद्रुक
जीवन गौरव पुरस्कार
बळवंत पांडुरंग पाटील कुरुकली
माध्यमिक शिक्षक विभाग
आदर्श शिक्षण अधिकारी
श्री. किरण अनंत लोहार कोल्हापूर
आदर्श मुख्याध्यापक
श्री सुरेश भैरान्ना मगदुम गडहिंग्लज
आदर्श शिक्षक
राजश्री विजय इंगवले व्हन्नूर, संदीप शामराव मुसळे चिमगाव,सुरेखा विराजित घोरपडे माध्याळ,. जयश्री विजय गंगाधरे कागल,
प्रसाद पांडुरंग दावणे कागल,
सुनिल अनंत रणवरें मुरगुड, चंद्रकांत विष्णु जाधव मुरगुड,
अनिल नारायण पाटील यमगे ,अविनाश महादेव चौगुले मुरगुड,
रघुनाथ बाबुराव कांबळे गोकुळ शिरगाव,
सौ वाहिदा अमीरइलाई मुल्ला गडहिंग्लज, दिलीप संतराम अडसुळे गडहिंग्लज,
रमन बाबुराव लोहार गडहिंग्लज,
महेश बाबुराव शेडबाळे कागल,
शंकर दादू कुरळे लिंगनूर कसबा नूल,
शरद बाबुराव पाटील आरदाळ,
आदर्श क्लार्क
बबन विठ्ठल पाटील मडिलगे आजरा
आदर्श शिपाई
श्री. आनंदा शिवराम खोत गडहिंग्लज